The Butterflies in My Garden

Garden is not just plants. It is sum total of much more than what our eyes can see.

Garden is the passion, the hardwork. It is a living and breathing entity.

In fact, it is an ecosystem that one creates, looks after.

Butterflies in the garden are the colorful bonus of all the hardwork.

However, butterfly does not simply emerge from the egg. There are various stages in its lifecycle. As much as one loves the sight of the butterfly, some stages in its lifecycle add to concern of the gardener.

The caterpillar!!! Sight of caterpillar on the plant that one has looked after as a child, is worrisome. The parental instinct is to get rid of the caterpillar that might harm the plant.

Little one knows that this same caterpillar would metamorphize into a butterfly one day.

With our garden, we are also creating a habitat for them. A much needed one in the urban landscape where they are losing their natural habitats at an alarming rate.

September 2020 was celebrated as the BIG BUTTERFLY MONTH.

Continuing this spirit, we bring a series of blogs and unveil a BUTTERFLY IDENTIFIER at the end of this blog series.

We are happy to present today a wonderful (and very colorful) blog by Roopalee Bhole.

बाग.. बाग म्हणजे फक्त वनस्पती नव्हेच.

आपण झाडे आणून लावतो, रोपे तयार करतो, बिया पेरतो .. मग त्या वनस्पतीच तर असतात की?

आपल्या नकळत आपली बाग फक्त आपली नसते. त्यात अनेक सूक्ष्म जीव, कीटक, पक्षी, प्राणी यांचा समावेश असतो. निसर्ग हा विविध जाती प्रजातींचा सामाजिक सहवास आहे. त्यात कुणी एकटा दुकटा नसतोच. मग तो निसर्ग घनदाट जंगलातील असू देत किंवा आपल्या बाल्कनीतील छोट्याशा कुंडीतील. यातील असंख्य संजीव एकमेकांवर अवलंबून असतात. आपापली प्रजाती टिकविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यात आपणही आहोतच.

साधारणतः बागेत अनेक कीटक, कोळी, फुलपाखरे, गांडुळे, मुंग्या, माशा, गोगलगायी, खार, गोम, सरडे, पाली, वाळ्या सारखे छोटे साप, पक्षी ई अनेक सजीव बागेत किंवा बागेच्या भोवती दिसून येतात. यातील सरडे, पाली, मुंग्या, गोम काही अळ्या इत्यादि दिसल्यावर अगदी ई ई होतं. आपलं आपल्या बागेवर नितांत प्रेम असतं. बागेतील पानफुलांच्या रंगासोबतच कुठल्या झाडाला नवीन पालवी फुटलीय ते कुठे फळ धरू पाहाताय अशी निरीक्षणे आनंददायी वाटतात. कुठलं पान पिवळं-तपकिरी पडलं, मावा, पांढरे ढेकूण, पांढरी माशी अशी कीड दिसली की धस्सं होतं. त्यातही मोठ्या मोठ्या बेढब, कधी केसाळ तर कधी चट्ट्यापट्ट्यांच्या अळ्या दिसल्या की अजूनच तारांबळ उडते,

बागेतील संत्र्याच्या झाडावर काटेरी सुरवंट (Parasa lepida/ blue-striped nettle grub)

बागेतील परिजातकावर hawlk moth चा सुरवंट

परिसरातील रुईच्या झाडावर प्लेन टायगर या फुलपाखराची अळी

 

हळदीच्या पानाची गुंडाळी करून लपलेली डेमन ग्रास फुलपाखराची अळी

परिजातकाच्या पानाखाली .. unidentified

पण फुलपाखरांना न्याहाळणं, त्यांच बागडणं याचा कंटाळा तर येत नाही आणि भीतीही वाटत नाही.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विविध रंगांची, सुंदर नक्षीदार पंखांची फुलपाखरे स्वच्छंदपणे बागेत बागडताना दिसतात. त्यांची उडण्याची लकब, स्वच्छंदपणा आपल्याला नेहमीच आकर्षून घेतो.

 

फुलपाखरच्या मिलनानंतर मादी तिच्या प्रजातीसाठी उपयुक्त अशा खाद्य वनस्पती शोधते. आपल्या बागेतील या वनस्पती कढीपत्ता, लिंबू वर्गीय झाडे, हळद, आले, सोनटक्का, कण्हेर इत्यादी अनेक असू शकतात. मादी शक्यतो अंडी पानांखाली घालते. फुलपाखरांच्या जातीनुसार अनड्यांचा आकार आणि वनस्पती ठरलेले असतात. एकावेळी मादी अनेक अंडी घालते. ती अन्नरसाने भरलेली असतात. आत

अळीची वाढ सुरू झाली की अंड्याचे कवच फिकट होत जाते. अनेकदा ते पारदर्शकही होते.

अळीची वाढ झपाट्याने होत असते.

पावसाळ्याच्या सुरुवातीला या बऱ्याचशा अळ्या लिंबू, हळद, कढीपत्ता अशा अनेक झाडांवर दिसतात.

जेवढी फुलपाखरे आकर्षक वाटतात तेवढ्याच या अळ्या नकोश्या होतात. याचे कारण म्हणजे या अळ्यांचं एकच उद्दिष्ट असतं, ते म्हणजे खाणं. झाडांची कोवळी पाने, शेंडे भसाभसा नष्ट होताना दिसतात. खरतर बागेतील झाडांचे नैसर्गिकरित्या pruning चे काम या अळ्या करतात. त्यांची विष्ठा झाडांना खत पुरवीत असते. त्या बेढब असतात. चित्रविचित्र डोळ्यांसारखे आकार त्यांच्या अंगावर असतात. त्या केसाळ असतात. बऱ्याचशा अळ्या पानांच्या खाली, पानांच्या आत, पानांची गुंडाळी करून आपले अन्न व निवास मिळवतात.

Red Pierrot या फुलपाखराचा पानफूटीच्या झाडावरील जीवनचक्र:

  1. पानफूटीच्या मांसल पानाच्या आत शिरलेली Red Pierrot फुलपाखराची अळी आणि तिची विष्ठा

२ एका पानातून दुसऱ्या पानाकडे शिरताना Red Pierrot ची अळी

३ पानाच्या खाली चिटकून बसलेला कोश

ही वाढ पूर्ण झाल्यावर कोशात रूपांतर होण्यासाठी अळी / सुरवंटाकडून योग्य, सुरक्षीत जागा शोधली जाते ती दाट पाने असलेल्या ठिकाणी, फांदीला, सहसा कुणाच्या दृष्टीस पडणार नाही अशी निवडली जाते.

अळी अवस्थांतर करून कोषात जाते आणि उपास सुरू होतो. अळी हा जीवनचक्रातील वाढ होऊ शकणारी अवस्था अन्न खाऊन साठवणे हेच तिचे उद्दिष्ट असतं.

फुलपाखरांच्या अळ्या, अंडी हे पक्षी, सरडे, काही कोळी इ. प्राण्यांचे अन्न. त्यामुळे या काळात यांचा बागेत राबता वाढतो. हळदीच्या पानाची गुंडाळी उकलुन आतील ग्रास डेमन या फुलपाखराच्या अळ्या खाण्यासाठी बुलबुल, शिंपी, दयाळ, वटवट्या यांच्या कसरती मी अनेकदा पाहिल्यात.

बागेतील हळदीच्या पानांवर टिपलेला Grass Demon या फुलापाखराचा जीवनक्रम

अळीपासून कोष तयार होऊन तो काही काळासाठी सुप्तावस्थेत जातो.

कोषातून फुलपाखराचा जन्म होणे ही अतिशय सुंदर घटना आहे. ते न्याहाळणं खूपच आनंददायी आणि उल्हासजनक आहे.

बाग फक्त फळे, भाज्या, फुले यांच्या उत्पादनापुरतीच मर्यादित राहता कामा नये. बागेतील पुलपाखरे, किटक, पक्षी यांच्या निरिक्षणातून नकळतपणे कुटुंब, शेजार, परिसरातील लोक निसर्ग संवर्धनाकडे वळू शकतात. किंवा अशी उदाहरणेही आहेत. अशा पद्धतीची ‘बाग’ बदलत्या जीवनशैलीमध्ये तणाव विरहित उपक्रम नक्कीच होऊ शकतो.

बागेमुळे, निसर्गातील या घटकामुळे निरिक्षण, जिज्ञासा, कुतुहल, अभ्यास आणि संवर्धन हा मार्ग निश्चितच आखला जाऊ शकतो. या मार्गावरून चालणं आनंददायी आणि अतिशय निर्मळ वाटते.

बागेकडे एक नैसर्गिक परिसंस्था म्हणून पाहणं ही निसर्गसंवर्धनाची बाराखडी आहे. त्यातून शब्द सांधून ही भाषा शिकण्याची, अवगत करण्याची प्रक्रिया अनुभवणं अमुल्य आहे.

फुलपाखराच्या जीवनचक्राचा हा पूर्ण प्रवास अवलोकला, अनुभवला की आपल्या घरातल्या छोट्याशा बागेतही हळूहळू एक परिसंस्था कशी आकाराला येत जाते हे लक्षात येतं आणि त्यातूनच पर्यावरण रक्षणाचा धडा मिळत जातो, ब्राउन लिफच्या निमित्ताने मायक्रोपासून ते मॅक्रोपर्यंतची ही सफर घडली, माझ्यासारख्या बाग वाचणारीला अजून दुसरं काय हवं?

 

Roopalee Bhole 

proopalee@gmail.com

Leave a Reply